ग्रामीण भागातील मुलींमध्ये आजही मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज, संकोच, अपुरी माहिती आणि स्वच्छतेच्या चुकीच्या सवयी आढळून येतात. मासिक पाळी हा नैसर्गिक जैविक प्रक्रियेचा भाग असला तरी सामाजिक, सांस्कृतिक व माहितीअभावी त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. याचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर, आत्मविश्वासावर आणि शालेय उपस्थितीवर होताना दिसतो.
ही बाब लक्षात घेऊन HER Foundation च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करणे व त्यांना योग्य साधनसामग्री उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
- ग्रामीण भागातील मुलींना मासिक पाळीविषयी योग्य, वैज्ञानिक व व्यवहार्य माहिती देणे.
- मासिक पाळीदरम्यान स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करणे.
- सॅनिटरी नॅपकिन्सचा सुरक्षित व योग्य वापर समजावून सांगणे.