परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले
गणेशोत्सवाच्या निमित्ताने चिंतामणी श्री युवादर्श गणेशोत्सव मंडळ, केळीबाग रोड, महाल, नागपूर यांच्या सहकार्याने Hygiene Education To Rural (HER) Foundation तर्फे दर्शनासाठी येणारे नागरिक तसेच परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, बीपी व शुगर तपासणी करण्यात आली. तसेच नागरिकांना हायजीन एज्युकेशन, आरोग्य व स्वच्छतेबाबत आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
Total Views |