जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त
HER Foundation तर्फे सेवादल नगर, भांडे प्लॉट येथे किशोरवयीन मुली व महिलांसाठी मासिक पाळी स्वच्छता जनजागृती व सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ. धनश्री कुरसकर यांनी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती प्रिया अग्रे यांनी सॅनिटरी पॅड वापराचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.
Total Views |