Hygiene Education to Rural (HER) Foundation व सायबर ॲम्बेसिडर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींकरिता नवप्रतिभा हायस्कूल, सक्करदरा येथे सायबर ॲम्बेसिडर अवेअरनेस कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये निखिल सर यांनी विद्यार्थिनींना सायबर गुन्हे म्हणजे काय, ऑनलाईन फसवणूक कशी ओळखावी, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदार वापर कसा करावा, वैयक्तिक माहिती व पासवर्डचे संरक्षण कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सायबर बुलिंग व ऑनलाईन छळ झाल्यास कोणती पावले उचलावीत, तक्रार कुठे व कशी नोंदवावी याची माहिती सोप्या व समजण्यासारख्या भाषेत देण्यात आली.